लखनऊ बाद फेरीच्या शर्यतीतून बाहेर   

हैदराबादचा सहा विकेटने विजय  

लखनऊ : लखनऊ सुपर जायंटस प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. सनरायजर्स हैदराबादने लखनऊवर ६ विकेटने विजय मिळवत आपली पराभवाची मालिका खंडीत केली आहे. अभिषेक शर्माने आक्रमक फलंदाजी करुन हैदराबादच्या विजयाचा पाया रचला. लखनऊ सुपर जायंटसने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ गमवत २०५ धावा केल्या होत्या. हैदराबादने १९ षटकामध्ये ही धावसंख्या पूर्ण केली. हैदराबादसाठी अभिषेक शर्माने अर्धशतक केले. 
 
लखनऊच्या एकना स्टेडियममध्ये हैदराबादला विजयासाठी २०६  धावांची आवश्यकता होती. हैदराबादची  सुरुवात चांगली झाली नाही. अथर्व तावडे १३  धावा करुन बाद झाला होता. मात्र, अभिषेक शर्मा आणि ईशान किशन यांच्या ८२ धावांच्या भागीदारीमुळे हैदराबादने ’कमबॅक’ केले.  अभिषेक शर्माने ५९ धावा केल्या, तर ईशान किशन  ३५ धावा केल्या. यानंतर हेनरिक क्लान आणि कामिंदू मेंडिसने ५५ धावांची भागीदारी करत हैदराबादला विजयापर्यंत पोहोचवले.
 
लखनऊला यंदाच्या आयपीएलमधील सातवा पराभव स्वीकारावा लागला. यामुळे लखनऊ सुपर जायंटस प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहे. आता प्लेऑफ साठी मुंबई आणि दिल्लीत स्पर्धा असेल. प्लेऑफमध्ये यापूर्वी गुजरात टायटन्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु दाखल झाले आहेत.

Related Articles